Edible Oil : खाद्यतेल आयातीचा ओघ सुरूच!

Team Agrowon

खाद्यतेलाचे भाव कमी करण्यासाठी सरकारने आयातशुल्कात मोठी कपात केली. नेमके याच वेळी आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे भाव कमी झाले होते.

Edible Oil | Agrowon

त्यामुळे देशात आयात १७.३७ टक्क्यांनी वाढून विक्रमी पातळीवर पोचली आहे. नुकत्याच संपलेल्या तेल विपणन वर्षात देशात १६५ लाख टन खाद्यतेल आयात झाली, अशी माहिती सॉल्व्हेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ‘एसईए’ने दिली.

Edible Oil Palm | agrowon

देशात कोरोनामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने खाद्यतेलाचे भाव वाढले होते. भाव कमी करण्यासाठी केंद्र सरकारने खाद्यतेल आयातशुल्कात कपात केली.

Edible Oil | Agrowon

यामुळे देशातही खाद्यतेलाचे भाव कमी झाले. सध्या खाद्यतेलाचे दर २०२१-२२ च्या पातळीवर आले आहेत.

Edible Oil | Agrowon

जून २०२३ मध्ये खाद्यतेल आयातशुल्कात सरकारने शेवटची कपात केली होती. सध्या कच्चे सोयातेल, कच्चे सूर्यफुल तेल आणि कच्चे पामतेल आयातीवर ५.५० टक्के शुल्क आहे. तर रिफाईंड सोयातेल, पामतेल आणि रिफाईंड सूर्यफूल तेलावर १३.१७ टक्के आयातशुल्क आहे.

Edible Oil | Agrowon

सरकारने खाद्यतेल आयातशुल्कात कपात केल्याने तेल विपणन वर्ष २०२२-२३ मध्ये (नोव्हेंबर २०२२ ते ऑक्टोबर २०२३) विक्रमी १६५ लाख टन खाद्यतेलाची आयात झाली. २०२१-२२ च्या वर्षातील आयात १४० लाख २९ हजार टन होती.

Edible Oil | Agrowon
क्लिक करा