Anuradha Vipat
दरवर्षी मच्छीमार समुदायाकडून नारळी पौर्णिमा साजरी केली जाते
नारळी पौर्णिमेदिवशी कोळी लोकं समुद्रकिनाऱ्यावर वरुण पूजा करण्यासाठी एकत्र येतात
असे मानले जाते की श्रावणी पौर्णिमेला पूजा केल्याने समुद्र प्रसन्न होतो.
समुद्राच्या संकटांपासून मासेमाऱ्यांचे रक्षण व्हावे यासाठी कोळी लोक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करतात
कोळी बांधवाचा 'नारळी पौर्णिमा' हा महत्त्वाचा सण आहे. नारळी पौर्णिमेनंतर बंद असलेली मच्छिमारी पुन्हा सुरू केली जाते.
यादिवशी कोळी बांधव वाजत-गाजत मिरवणूक काढतात आणि दर्याला नारळ अर्पण करतात.
दिवशी कोळी बांधवांच्या घरी 'नारळाच्या वड्या' आणि 'नारळी भात' केला जातो.