Mahesh Gaikwad
पिस्ता हा सुक्यामेवाचा प्रकार आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात. जे आरोग्यासाठी लाभदायक असतात.
पिस्तामध्ये कमी कॅलरी आणि भरपूर प्रमाणात फायबर असते. यामुळे पोट दिर्घकाळापर्यंत भरल्यासारखे वाटते. ज्यामुळे भूक नियंत्रित होते.
पिस्ता ह्रदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. यामधील मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात, जे ह्रदय विकाराचा धोका कमी करतात.
रक्तातील साखर नियंत्रिक करण्यासाठी पिस्ता फायदेशीर आहे. याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते.
पिस्तामध्ये डोळ्याच्या आरोग्यासाठी पोषक घटक असतात. पिस्ता खाण्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते याशिवाय दृष्टी सुधारण्यास मदत होते.
पिस्तामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुधारते. यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात.
पिस्ता खाणे त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटामिन-बी असते, जे त्वचा उजळण्यास मदत करते. ह
पिस्तामध्ये असणाऱ्या मेलाटोनिन या घटकामुळे चांगली झोप लागते. ही माहिती सामान्य माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.