Mahesh Gaikwad
उन्हाळ्याच्या दिवसात उष्ण तापमान आणि उन्हाच्या झळांमुळे त्वचा कोरडी पडणे, काळवंडणे यासारख्या समस्या होतात. आज आपण उन्हाळ्याच्या दिवसातं त्वचेची काळजी कशी घ्यायची या सोप्या टिप्स पाहुयात. त्वचा कोरडी पडणे, काळवंडणे यासारख्या समस्या होतात.
उन्हाळ्यात त्वचेवरील तेलकटपणा वाढतो. यासाठी सकाळी चेहरा सौम्य, फेसवॉशने धुवा, जेणेकरून त्वचा फ्रेश आणि स्वच्छ राहील.
उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता होते. त्वचेचा नैसर्गिक ग्लो टिकून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. यामुळे त्वचा हायड्रेट राहते.
उन्हाळ्यात अनेकांची त्वचा कोरडी पडते. यासाठी मॉईश्चरायझर वापरणे आवश्यक आहे.
मृत त्वचा आणि त्वचेवरील घाण काढण्यासाठी सौम्य स्क्रब वापरा. अधिक स्क्रबिंग केल्याने त्वचा कोरडी होऊन जळजळ होऊ शकते.
घरातून बाहेर पडण्याआधी १५ मिनिटे कमीत-कमी SPF-30 असलेले सनस्क्रीन लावूनच घराबाहेर पडा.
या दिवसांत आहारकडे विशेष लक्ष द्या. कलिंगड, काकडी, टोमॅटो, स्ट्रॉबेरी यांसारखी फळे त्वचेसाठी उत्तम असतात. या फळांनी त्वचेला नैसर्गिक थंडावा मिळतो.
झोप पुरेशी झाली घ्या. अपुऱ्या झोपेमुळे त्वचा डल पडते. दररोज ७-८ तास झोप घेतल्यास त्वचा नैसर्गिक पद्धतीने रिफ्रेश होते. ही माहिती सामान्य माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.