Curd At Night : रात्री दही खावं का? जाणून घ्या आरोग्यासाठीचे फायदे?

Mahesh Gaikwad

रात्री दही खावे का?

बऱ्याचदचा घरातील मोठे लोक रात्री दही खाऊ नये, असे सांगतात. पण योग्य प्रमाणात दही खाल्ले तर ते आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Curd At Night | Agrowon

गाढ झोप

दह्यामध्ये झोपेसाठी उपयुक्त असणारे घटक हार्मोन्सची निर्मिती वाढवतात. यामुळे चांगली व गाढ झोप लागते.

Curd At Night | Agrowon

आतड्यांचे आरोग्य

दह्यामध्ये प्रोबायोटीक बँक्टेरिया असतात, जे आतड्याचे आरोग्य सुधारतात. रात्री दही खाल्ल्यामुळे पचनक्रियाही सुलभ होते.

Curd At Night | Agrowon

चमकदार त्वचा

चमकदार त्वचेसाठी दही उत्तम आहे. यातील लॅक्टिक अॅसिड त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक येते.

Curd At Night | Agrowon

मजबूत हाडे

दही हे कॅल्शियम आणि फॉस्फरसचा उत्तम स्रोत आहे, जे रात्री खाल्ल्यामुळे शरीरात चांगल्या प्रकारे शोषले जाते. परिणामी हाडे आणि दात मजबूत होतात.

Curd At Night | Agrowon

वजन नियंत्रणात राहते

रात्रीच्यावेळी दही खाल्ल्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे अति खाणे टाळले जाते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Curd At Night | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

दह्यातील जीवंत सूक्ष्मजीव शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात.

Curd At Night | Agrowon

असे खा

रात्री दही थेट न खाता त्यात थोडी साखर, काळे मीठ किंवा मसूर डाळ घालून खाल्ल्यास पचनास मदत होते. थंडी हवामानात खाणे टाळावे. ही माहिती सामान्य माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Curd At Night | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....