sandeep Shirguppe
भातामध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. तर दही दाहकविरोधी असल्याने मेंदूत सेरटोनिन जास्त प्रमाणत तयार होते.
दही भात नियमित खाल्याने वजन कमी होते. दह्यातील गुणधर्म तूमच्या कॅरलीज कमी करण्यात मदत करतात.
दही भात खाल्ल्याने पोट शांत राहते. अन्न पचायला मदत होते. तसेच, जुलाबही कमी होतात.
रोज दही खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल संतुलित राहते. हे रक्तदाब आणि उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करते.
दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स निरोगी आतडे राखण्यास मदत करतात.
दह्यामध्ये सूक्ष्म जीव असतात जे शरीरासाठी चांगले असतात.
दह्यामध्ये असलेले कॅल्शियम कॉर्टिसोलचे उत्पादन कमी करते आणि त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
दह्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असते. हे दोन्ही हाडांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत.