Mahesh Gaikwad
जर तुम्हाला वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असेल, तर ही लक्षणे केवळ थकवा किंवा तणावाची नसून यामागे काही गंभीर कारणे असू शकतात.
बऱ्याचदा पुरेशी झोप न झाल्यामुळे मेंदूला विश्रांती मिळत नाही. परिणामी वारंवार डोके दुखते. विशेषतः सकाळी उठल्यानंतर डोके जड होते.
कामाच्या ताणामुळे वेळेवर जेवण न केल्यामुळे किंवा उपाशी राहिल्याने रक्तातील साखर कमी होते परिणामी डोकेदुखी होते.
अनेकांना विविध कारणांनी तणाव, चिंता आणि नैराश्य येते. यामुळे मेंदूवरील ताण वाढतो. परिणामी ताणतणावजन्य डोकेदुखी होते.
अनेकांना कमी पाणी पिण्याची सवय असते. अशावेळी शरीरातील पणी कमी झाले की मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळेही डोके दुखते.
अर्धे डोके दुखणे, प्रकाश किंवा आवाजाने त्रास होणे, उलट्या होत असतील, तर हे मायग्रेन म्हणजेच अर्धशिशीचे लक्षण असू शकते. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
दिर्घकाळ मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्ही स्क्रीनकडे पाहिल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. त्यामुळे डोके आणि कपाळ दुखते.
जर तुम्हाला वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असेल, तर दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.