Mahesh Gaikwad
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात बऱ्याच जणांना ताण-तणवामुळे कमी वयातच गंभीर आजारांच्या समस्या भेडसावत आहेत.
निरोगी शरीर आणि उत्तम आरोग्यासाठी दररोज नियमित योगाभ्यास केल्यास गंभीर आजारांचा धोका तुम्ही टाळता येवू शकतो.
योग प्रकारांमध्ये मलासन हे एक महत्त्वाचे आसान आहे. हे एक सोपे पण तितकेच प्रभावी आसान आहे. याला गार्डलँड पोज असेही म्हणतात.
या आसनामुळे पोटावर दाब येतो. त्यामुळे पोट साफ न होते. तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होऊन पचनही सुधारते.
मलासन कंबर, कुल्हे आणि पाठीच्या खालच्या भागासाठी फायदेशीर आहे. यामुळे कंबरदुखीपासून आराम मिळतो.
गर्भवती महिलांसाठी हे उपयुक्त आसन असून प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली याचा अभ्यास केल्यास सुलभ प्रसूती होण्यास मदत होते.
मलासन आसनामुळे गुडघे आणि टाच यामध्ये लवचिकता निर्माण होते. तसेच सांधेदुखीच्या तक्रारी कमी होतात.
दररोज नियमित फक्त ५-१० मिनिटे मलासन केल्यास संपूर्ण शरीरात सकारात्मक बदल दिसून येतात.