Swarali Pawar
तुरीची सोंगणी करून पेंढे बांधून उन्हात वाळवावेत. ३–४ दिवस ऊन दिल्यास दाण्यातील ओलावा कमी होतो.
दाण्यातील आर्द्रता १२–१३ टक्के असावी. दाताखाली दाणा तुटताना “टच” आवाज आला तर मळणी योग्य असते.
लहान क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी हातमळणी उपयुक्त ठरते. दाण्यांचे नुकसान कमी होते व गुणवत्ता टिकून राहते.
हातमळणीसाठी जास्त मजूर व वेळ लागतो. मजुरी खर्च वाढतो आणि प्रक्रिया उशीराने पूर्ण होते.
मजूर टंचाईत यंत्रमळणी शेतकऱ्यांना सोयीची ठरते. मोठ्या क्षेत्रातील मळणी काही तासांत पूर्ण होते.
यंत्रमळणीत मजुरी खर्च वाचतो आणि दाणा स्वच्छ मिळतो. ओलावा जास्त असल्यास दाणे फुटण्याचा धोका असतो.
मळणीनंतर पुन्हा ऊन देऊन हवाबंद साठवण करावी. धुरीकरण केल्यास किडींचा प्रादुर्भाव टाळता येतो.
शेतातील अवशेष काढून खोल नांगरणी करावी. फर्दळीचे पीक टाळल्यास कीड-रोगांचा धोका कमी होतो.