Anuradha Vipat
शरीरातील उष्णता वाढण्यामागे बाह्य हवामान, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, शरीरातील पाण्याची कमतरता आणि काही अंतर्गत वैद्यकीय कारणे असू शकतात.
जेव्हा शरीराला स्वतःचे तापमान नैसर्गिकरीत्या नियंत्रित करणे कठीण होते, तेव्हा अंगात उष्णता वाढल्यासारखे वाटते.
दिवसभरात पुरेसे पाणी न प्यायल्यास शरीराला घाम येऊन थंड होण्याची प्रक्रिया मंदावते, ज्यामुळे अंतर्गत उष्णता वाढते.
जास्त मसालेदार पदार्थ, तळलेले अन्न आणि मांसाहार पचवण्यासाठी शरीराला जास्त ऊर्जा लागते, त्यामुळे शरीराचे तापमान वाढते.
चहा, कॉफी किंवा अल्कोहोलच्या अतिसेवनामुळे शरीरातील पाणी कमी होते आणि उष्णता निर्माण होते.
कडक उन्हात काम केल्याने किंवा खूप जास्त व्यायाम केल्याने चयापचय वेगवान होते आणि शरीरात उष्णता तयार होते.
हवा खेळती न राहणारे घट्ट कपडे घातल्यास शरीरातील उष्णता बाहेर पडू शकत नाही.