Anuradha Vipat
नवरात्रीत अनेक लोक चप्पल घालणे टाळतात. नवरात्रीत अनवाणी चालले पाहिजे अशी प्रथा देखील आहे.
पण तुम्हाला नवरात्रीत अनवाणी चालण्यामागे काय शास्त्र आणि कारण आहे हे माहिती आहे का?
नवरात्रीत अनवाणी चालण्यामुळे श्रद्धा आणि आरोग्य या दोन्ही गोष्टींचा मेळ साधला जातो असं म्हणतात.
नवरात्रीत अनवाणी चालण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन कारणे आहेत
धार्मिक कारण म्हणजे अनवाणी चालणे हे पावित्र्य, शुद्धता आणि देवाप्रती असलेली शरणागती.
वैज्ञानिक कारण म्हणजे अनवाणी चालल्यामुळे शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यास मदत होते .
एकंदरीत अनवाणी चालल्यामुळे नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते