Maize Armyworm: मक्यावरील लष्करी अळीवरील फवारण्या फेल का होतात? जाणून घ्या चुका!

Swarali Pawar

अळीची अवस्था

अळीची अवस्था ओळखली जात नाही. लहान अळी असताना नियंत्रण सोपे असते. मोठी अळी झाली की औषधांचा परिणाम कमी होतो.

Armyworm Control | Agrowon

उशिरा फवारणी

अळी मोठी झाल्यावर फवारणी केल्यास उपयोग होत नाही. वेळीच लक्ष दिले तर नुकसान टाळता येते.

Armyworm Control | Agrowon

पोंग्यात फवारणी

लष्करी अळी मक्याच्या पोंग्यात लपून खाते. वरवर फवारणी केल्याने औषध अळीपर्यंत पोहोचत नाही.

Armyworm Control | Agrowon

चुकीचे औषध निवडणे

पहिल्याच फवारणीत खूप जोरदार औषध वापरले जाते. यामुळे काही अळ्या वाचून औषधांना प्रतिकार करतात.

Armyworm Control | Agrowon

वारंवार तेच औषध वापरणे

एकाच प्रकारचे औषध सतत वापरल्याने अळी बळकट होते. मग पुढील फवारण्या निष्फळ ठरतात.

Armyworm Control | Agrowon

फक्त रसायनांवर भर

जैविक उपाय व सापळे न वापरता फक्त फवारणी केली जाते. यामुळे अळीचे संपूर्ण नियंत्रण होत नाही.

Armyworm Control | Agrowon

शेत निरीक्षणाचा अभाव

शेताची नियमित पाहणी केली जात नाही. अळी वाढल्यानंतरच लक्षात येते.

Armyworm Control | Agrowon

योग्य मार्ग

लहान अळी असतानाच योग्य फवारणी करा. जैविक व रासायनिक उपाय एकत्र वापरल्यास नियंत्रण शक्य होते.

Armyworm Control | Agrowon

Low Milk Yield: थंडीमध्ये जनावरांचं दूध उत्पादन का कमी होतं?

Agrowon
अधिक माहितीसाठी...