Swarali Pawar
लहान करड्यांचा मृत्यू हा शेळीपालकांसाठी मोठा तोटा असतो. पण त्यामागची कारणं वेळेवर ओळखली तर मरतुक टाळता येते.
अस्वच्छता, गर्दी आणि ओलसर वातावरणात आजार पटकन पसरतात. यामुळे करडे कमजोर होऊन आजाराला बळी पडतात.
जन्मानंतर लगेच चीक दूध मिळणं खूप महत्त्वाचं असतं. ते न मिळाल्यास करड्यांची प्रतिकारशक्ती कमी होते.
हिवाळ्यात थंड आणि ओलसर हवेमुळे शरीराचं तापमान कमी होतं. हायपोथर्मीयामुळे लहान करड्यांचा मृत्यू होऊ शकतो.
खाद्यात सेलेनियम कमी असेल तर व्हाईट मसल डिसिज होतो. यामुळे करडे चालू शकत नाहीत आणि अचानक मृत्यू होऊ शकतो.
दमट वातावरणात जंतांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे करडे कमजोर होऊन वारंवार आजारी पडतात.
पिलाचं वजन जास्त असेल किंवा ठेवण चुकीची असेल तर अडचण येते. वेळीच मदत न मिळाल्यास कमजोर किंवा मृत पिले जन्माला येतात.
स्वच्छता, योग्य पोषण आणि वेळेवर उपचार खूप महत्त्वाचे आहेत. थोडी काळजी घेतली तर करड्यांची मरतुक नक्कीच कमी करता येते.