Egg Incubation at Home: नैसर्गिक अंडी उबवणूक: कमी खर्चात निरोगी पिल्ले कशी मिळवायची

Swarali Pawar

घरच्या घरी पिल्ले तयार करा!

खुडूक कोंबडीच्या मदतीने अंडी नैसर्गिक पद्धतीने उबवता येतात. ही पद्धत सोपी, कमी खर्चाची आणि गावाकडे जास्त वापरली जाते.

Hatching eggs at home | Agrowon

योग्य अंडी कशी निवडावी?

उबवण्यासाठी ५० ते ६० ग्रॅम वजनाची, स्वच्छ आणि एकसारखी अंडी निवडा. रोगमुक्त आणि चांगली अंडीच ठेवली तर पिल्ले निरोगी निघतात.

Selection of Eggs | Agrowon

कोंबडीची निवड महत्त्वाची

कोंबडी सशक्त आणि निरोगी असावी. खुडूक म्हणजे अंडी घालून बसलेली कोंबडी उबवण्यासाठी योग्य असते.

Selection of Hen | Agrowon

उबवण्यासाठी व्यवस्था?

खोक्यात किंवा टोपलीत मऊ गवत अंथरून मध्यभागी अंडी ठेवा. कुत्रा-मांजरांपासून सुरक्षित जागा निवडणे गरजेचे आहे.

Incubation Planning | Agrowon

किती अंडी ठेवावीत?

देशी कोंबडीखाली १५ ते १८ तर विलायती १० ते १२ अंडी ठेवता येतात. जास्त अंडी ठेवल्यास सर्वांना नीट उब मिळत नाही.

उबवताना काय काळजी घ्यावी?

कोंबडीला सकाळ-संध्याकाळ खाणे-पाणी द्यावे. ती बाहेर गेल्यावर अंडी गवताने झाकून ठेवावीत.

Care While Incubation | Agrowon

अंड्यांची तपासणी कशी करावी?

पाचव्या दिवशी टॉर्चच्या मदतीने अंडी तपासा. ज्यात जीव वाढत नाही अशी अंडी वेळीच काढून टाका.

Eggs Check uo | Agrowon

पिल्ले बाहेर पडल्यावर

२०–२१ दिवसांनी पिल्ले कवच फोडून बाहेर येतात. कोंबडी त्यांना दाणे-पाणी शिकवते आणि आठ आठवड्यांनी ती स्वावलंबी होतात.

After Hatching Eggs | Agrowon

AI in Sugarcane: एआय आधारित ऊस शेतीचे फायदे काय? उत्पादनात वाढ शक्य?

Agrowon
अधिक माहितीसाठी..