Team Agrowon
‘ब्रूडर न्यूमोनिया’ हा संसर्गजन्य परंतु सांसर्गिक नसलेला बुरशीजन्य आजार आहे. हा आजार पहिल्या २ ते ३ आठवड्यांच्या पिलांमध्ये दिसून येतो.
पावसाळ्यात सतत साचणारे पाणी आणि वातावरणातील दमटपणामुळे बुरशीसाठी पोषक वातावरण तयार होते.
पावसाळ्यात कोंबड्यांमध्ये होणारे बरेचसे बुरशीचे आजार हे व्यवस्थापनातील दोषामुळे होतात. ‘ब्रूडर न्यूमोनिया’ हा संसर्गजन्य परंतु सांसर्गिक नसलेला बुरशीजन्य आजार आहे.
हा आजार एस्परजीलस फ्युमिगेटस बुरशीच्या प्रजातींमुळे होतो. हा आजार पहिल्या २ ते ३ आठवड्याच्या पिलांमध्ये दिसून येतो.
शेडमधील लिटर आणि खाद्य भिजल्यावर त्यावर बुरशी वाढते. बुरशीचे बीजाणू श्वासाद्वारे श्वसनसंस्थेत प्रवेश करून फुफ्फुसाचा दाह (न्यूमोनिया) निर्माण करतात.
ब्रूडर न्यूमोनियामुळे लहान पिलांमध्ये वाढ खुंटते, पिले मृत्युमुखी पडतात. विशेषत: ७ ते ४० दिवसांच्या कोंबडीमध्ये या आजाराची तीव्र प्रभाव दिसून येतो.
प्रभाव कमी करण्यासाठी योग्य वेळी निदान होणे गरजेचे आहे.