sandeep Shirguppe
पावसाळ्यात खास करून व्हिटॅमिन सी समृद्ध असलेली फळे आणि भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो.
पावसाळ्यातील आजारांपासून संरक्षण करण्यासाठी नाशपाती फळ खाण्याचा सल्ला दिला जातो.
मधुमेह आणि हृदयविकाराच्या रूग्णांसाठी हे फळ अतिशय फायदेशीर मानले जाते.
नाशपाती फळ रोज खाल्ल्याने पचनक्रिया सुधारतेच, शिवाय आतड्यांची हालचाल देखील सुधारते.
नाशपातीमध्ये व्हिटॅमिन सी सोबतच इतर अनेक अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळून येतात.
नाशपातीमध्ये Procyanidin antioxidant चे विपुल प्रमाण आढळते. त्यामुळे, हृदयाच्या स्नायूंचा कडकपणा कमी करण्यास मदत होते.
नाशपाती अँथोसायनिनने समृद्ध आहे. हे एक अँटिऑक्सिडेंट असून यात मधुमेह आणि दाहक-विरोधी प्रभाव दिसून येतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.