Swarali Pawar
थंडीत शरीर उबदार ठेवण्यासाठी जनावरं जास्त ऊर्जा खर्च करतात. त्यामुळे दूध निर्मितीसाठी उपलब्ध ऊर्जा कमी राहते.
थंड पाणी प्यायची इच्छा कमी होते. दूध ८५% पाण्याचे असल्याने पाणी कमी प्यायल्यास दूध उत्पादन घटते.
अतिथंड हवामानात जनावरांची भूक कमी होते. यामुळे आवश्यक पोषण मिळत नाही आणि दूध कमी होते.
थंडीमुळे ऑक्सिटोसिनसारख्या संप्रेरकांच्या स्रवणात अडथळा येतो. त्यामुळे दूध उतरण्याची प्रक्रिया मंदावते.
न्यूमोनिया, खोकला, ताप यांसारख्या आजारांमुळे ऊर्जा रोगप्रतिकारासाठी खर्च होते. दूध उत्पादनावर त्याचा परिणाम होतो
हिवाळ्यात हिरव्या चाऱ्याची कमतरता भासते. त्यामुळे जीवनसत्त्वे व खनिजे पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत.
थंड वारा, ओलावा आणि खराब वायुविजनामुळे जनावरांवर अतिरिक्त ताण येतो. याचा दूध उत्पादनावर वाईट परिणाम होतो.
उबदार गोठा, संतुलित आहार, कोमट पाणी आणि वेळेवर उपचार केल्यास हिवाळ्यातही दूध उत्पादन टिकवता येते.