Swarali Pawar
वासराच्या जन्मानंतर ३–४ दिवस येणाऱ्या घट्ट, पिवळसर दुधाला चीक म्हणतात. हा चीक आतड्यांत पटकन शोषला जातो आणि वासराला ताकद देतो.
वासराला जन्मानंतर शक्यतो १ तासाच्या आत चीक पाजावा. उशीर झाल्यास रोगप्रतिकारक घटक शोषण्याची क्षमता कमी होते.
वासराच्या वजनाच्या सुमारे १० टक्के चीक दररोज द्यावा. २० किलो वासरासाठी साधारण २ लिटर चीक आवश्यक असतो.
चीक एकदम न देता दिवसात विभागून द्यावा. पहिल्या वेळी १.५–२ लिटर आणि नंतर १–१.५ लिटर द्यावा.
पहिले तीन दिवस वासराला फक्त चीकच द्यावा. चौथ्या दिवसापासून दूध व स्टार्टर फीड हळूहळू सुरू करावा.
जास्त चीक दिल्यास वासराला जुलाब आणि अतिसार होतात. कमी चीक दिल्यास पोषण अपुरे राहते आणि वाढ खुंटते.
चीकामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते व जुलाब, न्यूमोनिया टळतो. वासरांची वाढ, पचनक्रिया आणि ताकद चांगली राहते.
चीकात इम्युनोग्लोब्युलिन्स, प्रथिने, जीवनसत्त्वे व खनिजे असतात. यामुळे वासरांचे आरोग्य, हाडांची वाढ आणि दीर्घायुष्य चांगले राहते.