Jowar Rate : परभणीत ज्वारीचे भाव का घसरले?

Team Agrowon

परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ज्वारीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

Jowar Rate | Agrowon

दोन महिन्यांपूर्वी ज्वारीचे दर प्रतिक्विंटल साडेचार ते पाच हजार रुपयांवर होते. परंतु गेल्या काही आठवड्यापासून किमान दर अडीच हजार रुपयांपर्यंत कमी झाले आहेत.

Jowar Rate | Agrowon

गतवर्षी कमी पाऊस झाल्यामुळे रब्बीचे क्षेत्र नापेर राहण्याची शक्यता होती. परंतु नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसानंतर या दोन जिल्ह्यांत रब्बी ज्वारीचा पेरा वाढला आहे.

Jowar Bajari | Agrowon

शुक्रवार (ता. ५) अखेर परभणी जिल्ह्यात ८६ हजार ५०५ हेक्टरवर तर हिंगोली जिल्ह्यात १६ हजार ८९९ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. ज्वारीचा पेरा वाढल्यामुळे दरात घसरण सुरू झाली आहे, असे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

Kharif Jowar | Agrowon

परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (ता. ५) ज्वारीची ४७ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ३००० ते कमाल ३५०० रुपये तर सरासरी ३३०० रुपये दर मिळाले.

Kharif Jowar | Agrowon

गुरुवारी (ता. ४) ज्वारीची ३५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ३००० ते कमाल ३८५० रुपये तर सरासरी ३६५० रुपये दर मिळाले.

Jowar | Agrowon

NEXT : मराठवाड्यात ज्वारीचं क्षेत्र यंदाही कमीच