Pulses Market : कडधान्याची आयात का वाढली?

Radhika Mhetre

देशात कमी पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे कडधान्याचे उत्पादन घटले आहे. यामुळे देशातील कडधान्य आयात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक झाली.

Pulses Market | Agrowon

एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत देशात जवळपास १५ लाख टनांची आयात झाली.त्यासाठी भारताला १२६ कोटी डाॅलर्स खर्च करावे लागले.

Pulses Market | Agrowon

केंद्र सरकारकडून कडधान्य उत्पादनात आत्मनिर्भर होण्याच्या वल्गना केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात कडधान्यांसाठी देशाचे आयातीवरील अवलंबित्व वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Pulses Market | Agrowon

अनेक प्रयत्न करूनही भारताला कडधान्य उत्पादनात स्वयंपूर्णता गाठता आली नाही. यंदा ‘एल निनो’चा फटका बसल्यामुळे कडधान्य उत्पादनावर मोठा परिणाम झाला. मागणीच्या तुलनेत कडधान्यांच्या पुरवठ्यात मोठा तुटवडा पडला.

Pulses Market | Agrowon

चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांमध्ये सुमारे १५ लाख टन कडधान्यांची आयात झाली. मागील हंगामात याच काळात आयात जवळपास ७ लाख टन होती.

Pulses Market | Agrowon

यंदा भारताने मसूर, तूर आणि उडीद आयात वाढविल्याने एकूण कडधान्य आयात वाढलेली दिसते. विशेषतः मसूरची आयात जवळपास तिप्पट वाढली. चालू आर्थिक वर्षात पहिल्या सहामाहीत मसूरची आयात ८ लाख टन झाली.

Pulses Market | Agrowon

मागील आर्थिक वर्षात याच कालावधीत आयात २ लाख ८१ हजार टन होती. महत्त्वाचे म्हणजे मागील संपूर्ण आर्थिक वर्षात (२०२२-२३) मध्ये ८ लाख ५८ हजार टन मसुराची आयात झाली होती.

Pulses Market | Agrowon
आणखी पाहा...