Anuradha Vipat
नियमित चालणे एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे, ज्यामुळे पचनशक्ती मजबूत होते आणि अनेक आरोग्य समस्या टाळता येतात.
चालण्यामुळे आतड्यांची हालचाल सुधारते, ज्यामुळे अन्न सहजपणे पचायला मदत होते.
नियमित चालण्यामुळे बद्धकोष्ठता होण्याची शक्यता कमी होते.
जेवणानंतर थोडं चालल्याने ऍसिडिटी आणि छातीत जळजळ होण्याची समस्या कमी होऊ शकते.
चालण्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते, ज्यामुळे मधुमेह आणि इतर आरोग्य समस्या टाळता येतात.
नियमित चालण्यामुळे वजन नियंत्रणात राहते आणि स्थूलपणा टाळता येतो.
चालण्यामुळे तणाव आणि नैराश्य कमी होतं, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते.