Anuradha Vipat
लहान मुलांना विशेषतः ६ महिने ते ५ वर्षांखालील मुलांना नियमित बिस्किटे देणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
बहुतेक बिस्किटे मैद्यापासून बनलेली असतात. मैद्यामध्ये फायबर नसतात ज्यामुळे मुलांमध्ये बद्धकोष्ठतेचा त्रास वाढतो
बिस्किटांमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. यामुळे लहान मुलांमध्ये लठ्ठपणा आणि दातांमध्ये किड लागण्याचे प्रमाण वाढते.
बिस्किटे कुरकुरीत ठेवण्यासाठी त्यात 'हायड्रोजनेटेड व्हेजिटेबल ऑईल' किंवा वनस्पती तुपाचा वापर केला जातो. हे मुलांच्या हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक असते .
बिस्किटे जास्त काळ टिकण्यासाठी त्यात 'सोडियम मेटाबायसल्फाइट' आणि 'बीएचए' सारखी रसायने वापरली जातात.
बिस्किटे खाल्ल्याने मुलांचे पोट भरल्यासारखे वाटते त्यामुळे ती घरचे पौष्टिक खाण्यास टाळाटाळ करतात.
बिस्किटमध्ये पोषक तत्वांची कमी असते, जे मुलांच्या विकासासाठी आवश्यक असतात.