Anuradha Vipat
दाबेली मसाला, बटाटे, पाव, मसाला शेंगदाणे, आंबट-गोड चिंचेची चटणी ,लसूण चटणी , दाणेदार डाळिंब, बारीक शेव, कोथिंबीर, कांदा, बटर किंवा तेल.
एका कढईत तेल गरम करा. त्यात दाबेली मसाला मंद आचेवर परता. चिंचेची चटणी, उकडलेले स्मॅश केलेले बटाटे आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा.
हे मिश्रण एका ताटात काढून पसरवा. त्यावर किसलेले ओले खोबरे, डाळिंबाचे दाणे, बारीक शेव आणि कोथिंबीर टाकून सजवा.
पाव मधून कापून घ्या. पावाच्या एका बाजूला तिखट लसूण चटणी आणि दुसऱ्या बाजूला गोड चिंचेची चटणी लावा.
पावाच्या मध्ये बटाट्याचे सारण भरा. त्यात थोडे मसाला शेंगदाणे आणि बारीक चिरलेला कांदा टाका.
तव्यावर थोडे बटर किंवा तेल गरम करा. पाव दोन्ही बाजूंनी छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
भाजलेल्या पावाच्या कडा बारीक शेवमध्ये घोळवा, जेणेकरून शेव तिथे चिटकेल.