Anuradha Vipat
थंडीच्या दिवसात झोपताना पाठीत कडकपणा जाणवणे किंवा पाठ दुखणे ही एक सामान्य समस्या आहे.
थंडीमुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. यामुळे स्नायूंना होणारा रक्तपुरवठा कमी होतो आणि ते कडक होतात.
पाठीच्या मणक्याच्या स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन आणि पोषक तत्वे न मिळाल्यास तिथे वेदना जाणवतात.
थंडीत सांध्यांमधील 'सायनोव्हियल फ्लुइड' थोडे घट्ट होते. यामुळे मणक्याच्या सांध्यांमध्ये घर्षण वाढून वेदना होतात.
थंडीपासून वाचण्यासाठी आपण अनेकदा शरीराचे मुटकुळे करून झोपतो . यामुळे मणक्यावर आणि स्नायूंवर अतिरिक्त ताण येतो.
थंडीत आपण व्यायाम कमी करतो किंवा जास्त वेळ एकाच जागी बसून राहतो, ज्यामुळे पाठीचे स्नायू कमकुवत होतात.
उन्हाचा संपर्क कमी आल्यामुळे शरीरात व्हिटॅमिन डी कमी होते, जे हाडांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.