Anuradha Vipat
पावसाळ्यात अनेक जण अशी तक्रार करतात की, "भूकच लागत नाही" किंवा "नेहमीपेक्षा कमी खाल्ले जाते.
पावसाळ्यात आर्द्रता वाढते, तापमान कमी होते आणि पचनक्रियेवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
पावसामुळे अनेकांची चालणे, व्यायाम किंवा बाहेर पडण्याची सवय कमी होते आणि भूकही कमी लागू शकते.
पावसाळ्यात व्हायरल इन्फेक्शन, सर्दी, ताप किंवा पोटाचे विकार होण्याची शक्यता वाढते.
थंड वातावरणामुळे तहान कमी लागते आणि अनेक लोक पुरेसे पाणी पीत नाहीत. याचा परिणाम पचनक्रियेवर होऊ शकतो.
ढगाळ वातावरण आणि सूर्यप्रकाश कमी मिळाल्याने काही लोकांमध्ये मूड बदलू शकतो, ज्याचा परिणाम खाण्याच्या सवयींवरही होऊ शकतो.
जर भूक अनेक दिवस कमी राहत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.