Summer Heat : थंडगार, चवदार पाण्यासाठी फ्रिजपेक्षा माठचं बरा

Team Agrowon

माठातील पाण्यालाच पसंती

उन्हाळा सुरु झाला की माठ आणण्याची लगबग सुरु होते. आता प्रत्येकाच्या घरात फ्रीज असले तरी उन्हाळ्यात माठातील पाणी पिण्यालाच पसंती दिली जाते.

Summer Heat | Agrowon

नैसर्गीक थंडावा

माठातील पाण्याला मातीमुळे नैसर्गीक थंडावा येत असल्याने फ्रीजमधील पाण्यापेक्षा माठातील पाण्याची चव काही औरच असते.

Summer Heat | Agrowon

माठाचे प्रकार

बाजारात लाल मातीचे, काळ्या मातीचे आणि पांढऱ्या मातीचे असे विविध प्रकार उपलब्ध असतात.

Summer Heat | Agrowon

काळ्या माठाचा जास्त वापर

लाल मातीच्या विविध आकाराच्या माठांना पसंती दिली जात असली तरी जुनं ते सोनं प्रमाणे काळ्या माठातच पाणी लवकर गार पडत असल्यामुळे अनेक जण काळे माठ च वापरतात.

Summer Heat | Agrowon

लाल माठांची किंमत जास्त

लाल मातीचे माठ दिसायला आकर्षक असतात. त्यामुळे या माठांची किंमत काळ्या माठापेक्षा जास्त असते.

Summer Heat | Agrowon

अजूनही मोठ्या रांजणाचा वापर

खेडेगावात मोठ्या कुटुंबात किंवा शहरात सार्वजनिक ठिकाणी थंड पाण्यासाठी अजूनही मोठ्या रांजणाचा वापर केला जातो.

Summer Heat | Agrowon

विविध घाटाच्या माठांनाही मागणी

तोट्या बसवलेले, झाकण असलेले, विविध घाटाच्या माठांनाही मागणी असते.

Summer Heat | Agrowon

कुंभारांनाही चांगला रोजगार

उन्हाळ्यात माठाच्या वाढलेल्या मागणीमुळे माठ बनवणाऱ्या कुंभारांनाही चांगला रोजगार मिळतो.

Summer Heat | Agrowon
आणखी पाहा...