sandeep Shirguppe
मार्च महिना सुरू झाला की उन्हाळ्याच्या झळा सुरू होतात. या वातावरणात उसाचा रस पिणे आरोग्यासाठी उपयुक्त आहे.
उन्हाळ्यात हात, पाय, डोळे यांची जळजळ होत असेल तर उसाचा रस उपयुक्त आहे.
उसाचा रस रिकाम्या पोटी, जेवणादरम्यान प्यायला हवा याने तहान कमी होते.
ज्यांना रोज गाडीवर उन्हातून फिरावे लागते, अशानी हमखास रोज एक ग्लास उसाचा रस प्यावा.
जर तुम्ही कमी पाणी पीत असाल तर उसाचा रस तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.
उसाच्या रसाने शरीरातील द्रव्याचे प्रमाण वाढते. किडनी स्टोन सारख्या आजारांपासून वाचू शकता.
उसाचा रस आपली पचनशक्ती वाढवतो. यामुळे पचनसंस्था सुरळीत होण्यास मदत होते.
नाकातून रक्त येणे, लघवीला आग होणे, जळजळ होणे असे त्रास होणाऱ्यांनी रोज उसाचा रस प्यावा.