Anuradha Vipat
काही विशिष्ट आरोग्य समस्या असलेल्या व्यक्तींनी तुपाचे सेवन करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
ज्यांना 'फॅटी लिव्हर', कावीळ किंवा सिरोसिस यांसारखे आजार आहेत त्यांनी तूप टाळावे.
जर तुम्हाला हृदयाशी संबंधित समस्या असतील तर तुपाचे अतिसेवन धोकादायक ठरू शकते.
तुपामध्ये रेचक गुणधर्म असतात. त्यामुळे जुलाब होत असताना तूप खाल्ल्याने त्रास वाढू शकतो.
जे लोक वेगाने वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी तुपाचे प्रमाण मर्यादित ठेवावे.
ताप असताना तुपाचे सेवन टाळावे कारण ते शरीरातील दोष वाढवू शकते
सामान्य निरोगी व्यक्तीसाठी दिवसाला १-२ चमचे शुद्ध तूप फायदेशीर असते.