Anuradha Vipat
मधुमेह असलेल्या लोकांसाठी साखर घातलेलं गोड दूध हे विषापेक्षा कमी नाही. जर दूधात साखर मिसळली तर रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते.
ज्या लोकांना अॅसिडिटी, बद्धकोष्ठता, गॅस, अपचन यासारख्या समस्या आहेत त्यांनीही साखर घातलेलं गोड दूध पिऊ नये.
साखरेचा तुमच्या त्वचेवरही थेट परिणाम होतो. जास्त साखरेमुळे शरीरात जळजळ वाढते, ज्यामुळे ऍलर्जी सारख्या त्वचेच्या समस्या वाढतात.
थायरॉईड रुग्णांसाठी साखर घातलेले गोड दूध देखील हानिकारक असू शकते.थायरॉईड रुग्णांनी साखरेशिवाय आणि क्रीमशिवाय दूध प्यावे.
वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी साखर घातलेले गोड दूध टाळावे. दुधात आधीच कॅलरीज असतात
लहान मुलांना जास्त साखर असलेले दूध पाजल्यास त्यांच्या पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो
दुधात साखर मिसळून ती जास्त वेळ तोंडात राहिल्यास, दातांमध्ये किडण्याची शक्यता वाढते.