Mahesh Gaikwad
देशभरात सध्या हिंदू धर्मातील पवित्र असा श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिना भगवान शंकराच्या आराधनेचा महिना म्हणून समर्पित आहे.
श्रावणाच्या महिन्यात प्रत्येकजण आपापल्या पध्दतीने शिवशंकराची आराधना करतात.
शिवशंकराची आराधना करताना शिवलिंगावर बेलपत्र. दूध, दही, चंदन, विविध फुले अर्पण केली जातात.
पण काही गोष्टी अशा आहेत, ज्या भगवान शंकराला अर्पण करू नये, अशी मान्यता आहे.
भगवान शंकराला कधीही कुंकू वाहिले जात नाही. तसेच श्रावणातील पुजेत शिवलिंगावर हळद वाहू नये.
शिंवलिंग किंवा शिवशंकराची आराधना करताना लाल रंगाची फुले वाहून नये.
तसेच शंकराची आराधना करताना शंकराला बेलपत्र अर्पण करावे, मात्र धोतऱ्याचे फूल अर्पण करू नये.