Healthy Diet : निरोगी आरोग्यासाठी कसा आहार घ्यायला हवा? जाणून घ्या

Mahesh Gaikwad

बदलती जीवनशैली

बदललेली जीवनशैली आणि धकाधकीचे आयुष्य यामुळे अनेकांना विविध आजरांचा सामना करावा लागतो. त्यामुळे आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

Healthy Diet | Agrowon

निरोगी आरोग्य

निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. शरीराला हेल्दी ठेवण्यासाठी आहारामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असायला पाहिजे, याची माहिती पाहूयात.

Healthy Diet | Agrowon

पोषणयुक्त आहार

शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आहारामध्ये पोषणयुक्त पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. निरोगी आरोग्यासाठी आहारात फळे, पालेभाज्या, फळभाज्यांचा समावेश असावा.

Healthy Diet | Agrowon

सफरचंद खा

सफरचंदामध्ये फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट असतात, जे शरीराचा फ्री रेडिकल्सपासून बचाव करतात. यामुळे पचनक्रियासुध्दा सुधारते.

Healthy Diet | Agrowon

Healthy Dietबदाम

बदामामध्ये पुरेशा प्रमाणात व्हिटामिन-ए, लोह, कॅल्शिअम आणि फायबर घटक असतात. त्यामुळे स्मरणशक्ती सुधारते आणि शरीरही निरोगी राहते.

Healthy Diet | Agrowon

एक अंडे खा

निरोगी शरीरासाठी दररोज एक अंडे खाणे फायदेशीर आहे. यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटामिन-बी १२ असते, जे शरीराला उर्जा पुरवते. रोज नाश्त्यामध्ये एक अंडे खाणे फायदेशीर असते.

Healthy Diet | Agrowon

जवस

जर तुम्हाला लठ्ठपणाची समस्या भेडसावत असेल, तर आहारामध्ये जवसाचा समावेश करावा. यामध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते, जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते.

Healthy Diet | Agrowon

पपई फायदेशीर

पपईमध्ये व्हिटामिन-ए, व्हिटामिन-सी आणि व्हिटामिन- ई ही जीवनसत्त्वे आढळतात. पपई खाण्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. ही बातमी सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Healthy Diet | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....