Mahesh Gaikwad
दूध उत्पादनासाठी भारतात गायी-म्हशी तसेच शेळीपालन केले जाते. पण गायी-म्हशीच नाहीतर गाढवाच्या दुधालाही मोठी मागणी असते.
अत्यंत गरीब आणि आज्ञाधारक असणारा पण तितकाच दुर्लक्षित असणारा प्राणी म्हणजे गाढव.
अनेक मोठ्या देशांमध्ये आजही गाढवांचा वापर वाहतूक, ओढकाम, शेती आणि इतर कष्टाच्या कामांसाठी केला जातो.
गाढवाचे दूध आरोग्यसाठी खूप पौष्टिक असते. गायी-म्हशींच्या तुलनेत गाढवाच्या दूध खूप महाग असते.
२०१९ च्या पशुगणनेनुसार भारतात गाढवांची संख्या १ लाख २० हजार इतकी आहे. ही संख्या २०१२ मधील पशुगणनेच्या तुलनेत ६१.२३ टक्क्यांनी कमी झाली आहे.
भारतात सर्वाधिक गाढवांची संख्या ही राजस्थानमध्ये आढळते. २०१९ मध्ये राजस्थानात गाढवांची संख्या २३ हजार होती. जी भारतातील इतर राज्यांपेक्षा जास्त आहे.
पशुगणनेनुसार महाराष्ट्रात फक्त १८ हजार गाढवे आहेत. २०१२ च्या तुलनेत ही संख्या ३९.५९ टक्क्यांनी कमी झाली आहे.
महाराष्ट्रातील बहुतांशी धोबी, वडार, कुंभार, कैकाडी समाजातील लोक गाढव पाळतात. आपल्या दैनंदिन उपजीविकेसाठी हे लोक गाढवांचा सांभाळ करतात आणि आपले पोट भरतात.