Mahesh Gaikwad
दिवसेंदिवस उन्हाच्या झळा असह्य होत चालल्या आहेत. वाढत्या उकाड्यापासून वाचण्यासाठी अनेकजण कोल्ड ड्रिंक पितात.
उन्हाळ्यात अनेकजण घशाला पडलेली कोरड घालविण्यासाठी कोल्ड ड्रिंक्सचा आधार घेतात.
इतर कोणतेही कोल्ड ड्रिंक पिण्यापेक्षा उन्हाळ्यात ताक पिणे खूप फायद्याचे असते.
आपल्या घरातील मोठी माणसं नेहमी सांगतात, की उन्हाळ्यात ताक पिणे आरोग्यासाठी चांगले असते.
दुधापासून तयार होणाऱ्या ताक आरोग्यासाठी फायदेशीर असते. उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी ताक फायदेशीर असते.
या दिवसांमध्ये रोज ताक प्यायल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
उन्हाळ्यात ताक प्यायल्यामुळे उष्माघाताचा प्रभाव कमी होतो.