Water Conservation : पाझर तलावासाठी कोणती जागा निवडाल?

Team Agrowon

पाझर तलावाचा उपयोग आणि प्रयोजन हे केवळ पडणारे पावसाचे पाणी वाहून न जाता, काही काळ थांबेल आणि त्यामुळे ते जमिनीत जिरून भूजल साठा वाढेल यासाठी आहे. हा काही साठवणीचा तलाव नव्हे, हे लक्षात घ्यावे.

Water Conservation | Agrowon

पाझर तलाव हा जर गावाच्या वरच्या बाजूला असेल, तर पडणाऱ्या पावसाचे पाणी या पाझर तलावात काही काळ थांबेल आणि जमिनीत मुरून हळूहळू खाली येईल.

Water Conservation | Agrowon

पडणारे पावसाचे पाणी कुठेही पाझर तलाव करून त्यात अडवता किंवा साठवता येते, हे बरोबर असले तरी अशा प्रकारे साठवलेल्या पाण्याचा उपयोग आहे की नाही याचा विचार आणि अभ्यास करून पाझर तलावाची जागा निश्चित केली तर फायदा होतो.

Water Conservation | Agrowon

आपण पाझर तलाव करणार आहोत त्या ठिकाणी मातीचा थर किती आहे, आपण ज्या खोलीपर्यंत तलाव खणत आहोत, त्या खोलीला तळाला माती आहे, मुरूम आहे की कातळ आहे, याचा अभ्यास करून त्या तलावाचे आकारमान निश्चित करावे लागते.

Water Conservation | Agrowon

जर तळाला कातळ आला तर पाणी खाली जिरू शकत नाही, तर आजूबाजूच्या जमिनीत माती असेल तिथे पसरते.

Water Conservation | Agrowon

जर खाली माती किंवा मुरूम असेल पाणी काही काळ थांबते आणि मग हळूहळू जमिनीत जिरून उताराने मार्गक्रमण करते किंवा त्या परिसरात साठून एक भूजल साठा वाढायला मदत करते.

Water Conservation | Agrowon

पाझर तलावाचा उपयोग आणि प्रयोजन हे केवळ पडणारे पावसाचे पाणी वाहून न जाता, काही काळ थांबेल आणि त्यामुळे ते जमिनीत जिरून भूजल साठा वाढेल यासाठी आहे.

Water Conservation | Agrowon