Swarali Pawar
जमिनीला भुसभुशीत करण्यासाठी योग्य अवजार निवडणं खूप गरजेचं आहे. चुकीची निवड केल्यास वेळ, खर्च आणि मेहनत वाया जाऊ शकते.
कल्टिवेटर माती मोकळी करतो, ढेकळं फोडतो आणि तण काढतो. यासाठी २५ ते ५० HP ट्रॅक्टरची गरज असते.
रिजिड टायन कडक जमिनीसाठी, स्प्रिंग टायन दगडी जमिनीसाठी योग्य. डकफूट टायन तण नियंत्रणासाठी आणि वरच्या थरासाठी उपयुक्त.
जमिनीचा प्रकार आणि ट्रॅक्टरची क्षमता लक्षात घ्या. हलक्या जमिनीसाठी ५-७ टायन, कडक जमिनीसाठी ९-१३ टायन निवडा.
पॉवर हॅरो माती बारीक करून पेरणीयोग्य बनवतो. एकाच फेरीत काम होऊन वेळ आणि इंधनाची बचत होते.
जमीन समतल होते आणि ओलावा टिकून राहतो. रोटावेटरची गरज कमी होते.
ट्रॅक्टरच्या HP नुसार यंत्राची रुंदी निवडा. लहान शेतासाठी १.५-३ मीटर, मोठ्या शेतासाठी ३-४ मीटर योग्य.
जमिनीचा प्रकार, तणांची स्थिती आणि ट्रॅक्टर क्षमता लक्षात घ्या. योग्य अवजार निवडल्यास मशागत सोपी आणि प्रभावी होते.