Mahesh Gaikwad
जगात सापाच्या अनेक प्रजाती आहेत. यामध्ये काही विषारी तर काही बिनविषारी आहेत.
पण अनेकदा साप दिसला की, तो विषारीच असेल या भावनेतून त्याला मारून टाकले जाते.
धोकादायक विषारी प्राण्यांच्या यादीत सापाचा समावेश होतो.
तुम्हाला जगातला सर्वात वेगाने सरपटणारा साप माहित आहे का?
साइडवाईंडर हे जगातील सर्वात वेगाने सरपटणाऱ्या सापाचे नाव आहे.
साइडवाईंडर सापचा सरपटण्याचा वेग ताशी २९ किलोमीटर इतका आहे. सपरटण्याच्या विशिष्ट शैलीमुळे या सापाचा वेग जास्त असतो.
सापाची ही प्रजाती प्रामुख्याने अमेरिकेच्या दक्षिण-पश्चिम वाळवंटीय प्रदेश आणि मेक्सिकोमध्ये आढळते.