Mahesh Gaikwad
बोन्सायची झाडे लहान आकाराची आणि दिसायला सुंदर असतात. बोन्सायच्या झांडांमुळे तुमच्या गार्डनच्या सौंदर्य खुलून जाते.
आज आम्ही तुम्हाला बोन्साय झाडाच्या देखभालीसाठी काही टीप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही तुमच्या बोन्साय झाडाची योग्यप्रकारे काळजी घेवू शकता.
चांगल्या वाढीसाठी बोन्साय झाडाला आठवड्यातून एकदाच पाणी द्यावे. जास्त पाणी दिल्याने ओलावा टिकून राहतो आणि झाड खराब होऊ शकते.
बोन्सायच्या झाडाला जास्त सुर्यप्रकाश लागत नाही. प्रखर सुर्यप्रकाशात झाड ठेवल्यास पाने जळू शकतात.
बोन्साय झाडासाठी १५ ते २३ अंश सेल्सिअस तापमान योग्य असते. जास्त गरम किंवा जास्त थंड तापमानात झाड ठेवू नये.
बोन्सायच्या झाडाची महिन्यातून एकदा तरी छाटणी करा. यामुळे रोपाची वाढ होण्यास मदत होते.
तसेच बोन्सायच्या झाडाला नियमितपणे सेंद्रिय खते द्या. जेणेकरून झाडाला लागणाऱ्या पोषण तत्त्वांची कमतरता भासणार नाही.