Pista Farming : महागड्या पिस्त्याची शेती कुठे होते?

Team Agrowon

भारतात जम्मू-काश्मीरमध्ये पिस्ता लागवड केली जाते. काही प्रमाणात कर्नाटक, तमिळनाडू, पश्‍चिम बंगाल, पंजाब राज्यांतही प्रायोगिक लागवड होते.

Pista Farming | Agrowon

अमेरिकेत कॅलिफोर्निया, ॲरिझोना विभागांत मोठ्या प्रमाणात पिस्ता लागवड केली जाते. पाणी कमी लागत असल्यामुळे अनेक शेतकरी बदाम, अक्रोडऐवजी पिस्ता शेती करतात.

Pista Farming | Agrowon

झाडांची योग्य वाढ होऊन त्यांना फळे येण्यासाठी सात ते दहा वर्षे लागतात. एक झाड पुढे १०० वर्षे फळे देते. साधारण लाल गुलाबी रंग आल्यावर फळे तयार होतात.

Pista Farming | Agrowon

फळे पक्व झाल्यानंतर यंत्राच्या साह्याने झाड हलवून फळे गोळा केली जातात. फळ काढणीसाठी झाड तीन ते चार सेकंद यंत्राने हलवले जाते, त्यामुळे पक्व फळे गळून पडतात.

Pista Farming | Agrowon

पक्व फळे गोळा केली जातात. पुढे प्रक्रिया करून कवचासह किंवा कवच विरहित प्रकारांमध्ये खारवून किंवा न खारवता फळांची विक्री वेगवेगळ्या मार्गातून केली जाते.

Pista Farming | Agrowon

पिस्ता हे फळ आनंदाशी संबंधित आहे, म्हणूनच चीनमध्ये या फळास ‘हॅपी नट’ आणि इराणमध्ये ‘स्माइलिंग नट’ असे म्हणतात.

Pista Farming | Agrowon

साधारण २८ ग्रॅम पिस्त्यांमधून एका अंड्याएवढी म्हणजे सहा ग्रॅम प्रथिने मिळतात. पिस्ता हे विविध प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंटचा खजिना आहे.

Pista Farming | Agrowon

मिठाई, फळांचे सॉस घट्ट करण्यासाठी पिस्त्याचा वापर केला जातो. अनेक आजारांवर उपचार आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पिस्त्याला मागणी आहे.

Pista Farming | Agrowon