Farm Pond : शेतात कोणत्या ठिकाणी खोदाल शेततळे?

Team Agrowon

आपल्या शेतात उपलब्ध असलेल्या खोलगट भागात योग्य आकारमानाचे व आकाराचे शेततळे करावे. जागा निवडताना शेतातील सर्व पाणी त्या निवडलेल्या जागेजवळ एकत्रित येईल याप्रमाणे वळवावे.

Farm Pond | Agrowon

शक्‍यतोवर खोलगट, शेताच्या खालच्या बाजूची जमीन निवडावी. पाण्याच्या प्रवाहाच्या मार्गावरील जागा निवडू नये. कारण अशी जागा निवडल्यास तळी गाळाने लवकर भरतात, त्यामुळे शेततळे प्रवाहाच्या बाजूला थोड्या अंतरावर खोदावे.

Farm Pond | Agrowon
  1. शेततळ्यातील पाण्याचा पाझर कमी करण्यासाठी शेततळ्यास अस्तरीकरण करणे गरजेचे आहे. अस्तरासाठी प्लॅस्टिक फिल्म वापरताना त्याची जाडी ३०० ते ५०० जीएसएम असावी.

Farm Pond | Agrowon

शेततळी ही काळ्या खोल जमिनीत बांधली गेली असतील तर अशा जमिनीत पाणी जास्त झिरपते, त्यामुळे पाण्याचे प्रमाण कमी राहते; शेततळ्यात गाळ राहण्याचे प्रमाण जास्त असते. यामुळे काही कालांतराने शेततळ्याची पाणी साठवणक्षमता कमी होते.

Farm Pond | Agrowon

शेततळे घेण्यापूर्वी मृद्‌ व जल संधारणाचे उपाय करावेत. त्यामुळे पावसाच्या वाहून येणाऱ्या पाण्याबरोबर गाळ वाहून येणार नाही.

Farm Pond | Agrowon

शेततळ्यात गाळ येऊ नये म्हणून पाण्याचा प्रवाह ज्या ठिकाणी शेततळ्यात प्रवेश करतो, त्या अगोदर २ बाय २ बाय १ मीटर आकाराचे खोदकाम करावे आणि पाणी ज्या बाजूने निर्गमित होते त्या ठिकाणी गवत लावावे.

Farm Pond | Agrowon

इनलेट व आउटलेट (प्रवेशद्वार व निर्गमद्वार) प्रवेशद्वाराच्या अगोदर साधारण दोन मीटर अंतरावर २ बाय २ बाय १ मीटर आकाराचा सिल्ट ट्रॅपचे (गाळ साठणारी जागा) खोदकाम करावे.

Farm Pond | Agrowon