Terrace Farming : भारतात टेरेस फार्मिंग कुठे होते?

Team Agrowon

भारतात सिक्कीममध्ये डोंगर उतारावर रुंद पायऱ्या पद्धतीने म्हणजेच टेरेस फर्मिंग शेती केली जाते.

Terrace Farming | Agrowon

२ ते ५ गुंठ्यांच्या आकाराच्या शेकडो पायऱ्या उंचावरून पायथ्यापर्यंत येतात. प्रत्येक पायरीला डोंगरामधील दगडाच्या बांधाने बंदिस्त केले जाते.

Terrace Farming | Agrowon

या पद्धतीमध्ये डोंगरांच्या माथ्यावरचे पाणी प्रत्येक पायरी पूर्ण भरल्यावर खाली येते.

Terrace Farming | Agrowon

असे शेवटच्या तळपायरीपर्यंत आल्यावर त्याचे लहान नदीमध्ये रूपांतर होते.

Terrace Farming | Agrowon

सिक्कीममधील डोंगर उतारावरील टेरेस फार्मिंग आणि तिला नजरेत समाविष्ट करणे हे निसर्गाचे स्वर्गीय रूप आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा अमृताप्रमाणे वापर करून जमिनीची धूप थांबवणे हा या मागचा उद्देश.

Terrace Farming | Agrowon

हवामान बदलास सामोरे जाताना डोंगर पर्वतराजीमधील वृक्ष श्रीमंती येथे आजही कायम ठेवली आहे.

Terrace Farming | Agrowon

पूर्वी नियमित पडणारा सलग पाऊस येथे सुद्धा एक दोन दिवसांमध्येच धुवाधार पडून आपली सरासरी पूर्ण करत आहे. या पावसाला पारंपरिक टेरेस फार्मिंग सक्षमपणे सामोरे जाते.

Terrace Farming | Agrowon
Gulvel | Agrowon