Alu Cultivation : अळूची लागवड कधी, कशी करावी?

Team Agrowon

अळू लागवड जून महिन्यात करावी. सरीमध्ये ९० सें.मी. अंतर ठेवून कंद लावून मातीने झाकावेत. ताबडतोब पाणी द्यावे.

Alu Cultivation | Agrowon

कोकण हरितपर्णी, श्री किरण, श्री रश्मी, श्री पल्लवी, सातमुखी आणि पंचमुखी या जाती चांगले उत्पादन देतात. 

Alu Cultivation | Agrowon

अळू लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, मध्यम ते भारी, चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी. योग्य मशागत करून जमीन तयार करावी.

Alu Cultivation | Agrowon

हे पीक कंदासाठी लावले असेल तर सहा महिने झाल्यावर काढणी करावी. पानांची काढणी २.५ ते ३ महिन्यांत करतात. त्यामुळे लागवड क्षेत्रावर पाण्याची सतत उपलब्धता असावी.

Alu Cultivation | Agrowon

जमीन चांगली नांगरून भुसभुशीत करावी. जमिनीत शेणखत मिसळून तीन फुटांवर सरी वरंबे काढावेत. 

Alu Cultivation | Agrowon

सरीमध्ये ९० सें.मी. अंतर ठेवून कंद लावून मातीने झाकावेत. ताबडतोब पाणी द्यावे.

Alu Cultivation | Agrowon
  1. लागवडीपूर्वी शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. माती परीक्षणानुसार हेक्टरी ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद, ८० किलो पालाश द्यावे. नत्र व पालाश खत समान तीन हफ्त्यात विभागून द्यावे. स्फुरद लागवडीच्या वेळी द्यावे. 

Alu Cultivation | Agrowon
Dragonfruit | Agrowon