Dragon Fruit Farming : ड्रॅग्रनफ्रुट लागवडीचा प्रयोग यशस्वी; तुम्हीही करू शकता ड्रॅग्रनफ्रुट शेती!

Team Agrowon

 देवगड येथील रामेश्वर आंबा संशोधन उपकेंद्राच्या प्रक्षेत्रावर १ एकरमध्ये ड्रॅग्रनफ्रुट लागवडीचा प्रयोग यशस्वी झाला असून पहिल्याच वर्षी या लागवडीतून उत्पादन मिळाले आहे.

Dragon Fruit Farming

संशोधन संस्थेने यशस्वी लागवड केल्यामुळे कोकणातील वातावरणात ड्रॅगनफ्रुट लागवड करण्यास संधी मिळणार असून आंबा लागवडीच्या सुरुवातीला आतंरपीक म्हणून उत्पादन घेण्यास शेतकऱ्यांना वाव आहे.

Dragon Fruit Farming

कोकणातील वातावरण आंबा, काजू, कोकम, जांभूळ, करवंदे यासह काही पारंपरिक पिकांसाठी पोषक असे म्हटले जायचे.

Dragon Fruit Farming

परंतु वातावरणातील बदलामुळे आंबा, काजू ही पिके गेल्या काही वर्षांपासून संकटात सापडल्याचे चित्र आहे.

Dragon Fruit Farming

वातावरणातील बदलानुसार पीक बदल किवा आंतरपिकांचे पर्याय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा संशोधन संस्थांचा प्रयत्न सुरू आहे.

Dragon Fruit Farming

दरम्यान आंबा पिकावर संशोधन करणाऱ्या डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, दापोलीच्या देवगड येथील रामेश्वर आंबा संशोधन उपकेंद्राच्या प्रक्षेत्रावर ड्रॅगनफ्रुट लागवडीचा प्रयोग यशस्वी करण्यात आला.

Dragon Fruit | Agrowon
क्लिक करा