Mahesh Gaikwad
आजकालच्या अनेक तरुण आणि मुले सुडौल शरीरयष्टीसाठी जिमला जातात. पण जिम करण्याचे योग्य वय, योग्य व्यायाम प्रकार माहित असणे अत्यंत महत्त्वाचे आहेत.
सामान्यतः १५-१६ वर्षांपासून हलक्या स्वरूपाच्या जिम एक्सरसाईजेस सुरू करता येतात. मात्र १८ वर्षांनंतरच पूर्ण क्षमतेने जिम ट्रेनिंग करणे योग्य मानले जाते.
अत्यंत कमी वयात अवजड व्यायाम केल्याने हाडांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. हार्मोनल असंतुलन आणि स्नायू दुखापतीचा धोकाही वाढण्याची शक्यता वाढते.
कोणत्याही वयात जिम करताना प्रमाणित फिटनेस ट्रेनरची मदत घेणे आवश्यक आहे. वय, शरीरयष्टीनुसार वर्कआउट प्लॅन असायला हवा.
योगा, कार्डिओ, बॉडी-वेट ट्रेनिंग, स्ट्रेचिंग हे १४-१८ वयोगटासाठी सुरक्षित पर्याय आहेत. कमी वयात वजन उचलणे टाळावे.
योग्य प्रोटीनयुक्त, संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. अति सप्लिमेंट्स वापरणं टाळावे. फक्त जिम पुरेसे नाही.
जिम म्हणजे केवळ शरीरसौष्ठव नाही, तर शिस्त, एकाग्रता, आत्मविश्वास वाढवण्याचे साधनही आहे.
१५ वर्षांनंतर व्यायामाची सवय लावणे उत्तम, पण प्रशिक्षित मार्गदर्शनाशिवाय जिम सुरू करू नये. यासाठी पालकांचा पाठिंबा आणि समजही महत्त्वाची ठरते.