Anuradha Vipat
ओठांचा रंग, पोत आणि त्यांचा आकार यावरून शरीराच्या अंतर्गत आरोग्याची स्थिती सहज ओळखता येते.
आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार, ओठ हे शरीरातील अनेक बदलांचे थेट दर्शक आहेत.
शरीरात रक्ताची कमतरता असण्याचे हे प्रमुख लक्षण आहे. शरीरात लाल रक्तपेशी कमी झाल्यास ओठांचा नैसर्गिक गुलाबी रंग फिकट पडतो.
रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यास ओठ निळसर दिसू लागतात.
ओठ सतत सुकणे हे शरीरात पुरेसे पाणी नसल्याचे सर्वात मोठे लक्षण आहे.
ओठांची त्वचा कोरडी होऊन निघणे हे शरीरात विटामिन बी-कॉम्प्लेक्स आणि लोहाची कमतरता दर्शवते.
ओठांच्या दोन्ही कोपऱ्यांमध्ये जखमा होणे किंवा कडा फाटणे याला 'अँगुलर चेइलायटिस' म्हणतात.