Anuradha Vipat
रात्रीचे जेवण आपल्या आरोग्यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते.
रात्रीच्या वेळी आपली पचनक्रिया मंदावलेली असते, त्यामुळे या वेळी काय खावे आणि काय टाळावे हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
खिचडी किंवा मूग डाळीचे वरण-भात,चपाती आणि सुकी भाजी पचनासाठी हे सर्वात हलके आणि उत्तम अन्न मानले जाते.
टोमॅटो, गाजर, किंवा मिक्स व्हेज सूप रात्रीच्या वेळी शरीराला पोषण देते आणि पोटही भरलेले ठेवते.
गव्हापेक्षा ज्वारी किंवा बाजरीची भाकरी पचनासाठी हलकी असते
रात्रीच्या वेळी जड, तेलकट आणि पचनास कठीण असणारे पदार्थ पूर्णपणे टाळावेत.
पिझ्झा, बर्गर, नूडल्स, पास्ता किंवा बेकरीचे पदार्थ रात्री अजिबात खाऊ नका. मसाल्यांच्या भाज्यांमुळे रात्री ॲसिडिटी आणि छातीत जळजळ होऊ शकते.