Anuradha Vipat
मानवी वस्तीत बिबट्याचा वावर वाढण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
बिबट्याला पाहून घाबरून पळू नका . पळाल्यामुळे प्राण्यामधील शिकार करण्याची प्रवृत्ती जागी होते.
हात वर करून किंवा जॅकेट पसरवून स्वतःला आकाराने मोठे दाखवण्याचा प्रयत्न करा.
बिबट्याकडे पाहत राहा पण त्याला एकटक पाहणे टाळा .
आरडाओरडा करा, टाळ्या वाजवा किंवा मोबाईलवर मोठ्याने गाणी लावा.
सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वी घराबाहेर पडताना नेहमी समूहाने बाहेर पडा.
बिबट्या उंचीवरून शिकार ठरवतो. खाली वाकल्यास तुम्ही त्याला लहान प्राणी वाटू शकता .