Anuradha Vipat
आजच्या वेगवान आणि तणावपूर्ण जीवनशैलीत अनेकदा अचानक छातीत धडधडणे, हात-पाय थरथरणे, नकारात्मक विचार येणे किंवा तीव्र अस्वस्थता जाणवणे यांसारख्या समस्या उद्भवतात.
जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते, तेव्हा गोंधळून न जाता स्वतःला कसे शांत करावे, याचे सोपे नियम माहीत असणे गरजेचे आहे.
अँझायटी आल्यावर श्वास वेगाने चालतो. हे रोखण्यासाठी ४ सेकंद श्वास आत घ्या, ४ सेकंद श्वास रोखून धरा, ४ सेकंदात श्वास बाहेर सोडा आणि पुन्हा ४ सेकंद थांबून ही प्रक्रिया ५ वेळा करा. यामुळे मेंदूला शांत होण्याचे संकेत मिळतात.
तुमचे लक्ष भीतीवरून हटवण्यासाठी तुमच्या सभोवतालच्या कोणत्याही ३ वस्तूंची नावे घ्या, तुम्हाला ऐकू येणारे ३ आवाज ओळखा आणि शरीराचे ३ भाग हळूवारपणे हलवा.
अचानक खूप अस्वस्थ वाटल्यास चेहऱ्यावर थंड पाण्याचे हबके मारा किंवा थंड पाणी प्या.
दोन्ही पाय जमिनीवर सपाट ठेवा आणि जमिनीच्या स्पर्शावर लक्ष केंद्रित करा. स्वतःला सांगा, "मी सध्या सुरक्षित आहे आणि ही वेळ निघून जाईल.
अस्वस्थता जाणवत असताना कडक चहा, कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्स पिणे पूर्णपणे टाळा.