Anuradha Vipat
भारतामध्ये सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळच्या थकव्यापर्यंत प्रत्येकाला 'चहा' हवाच असतो.
चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या वेळी घेतलेला चहा तुमच्या आरोग्याला हळूहळू आतून पोखरू शकतो.
सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी चहा पिल्याने शरीरात ॲसिडचे प्रमाण वाढते.
चहामध्ये 'टेनिन' नावाचे तत्व असते. जेवणासोबत किंवा जेवणानंतर लगेच चहा पिल्यास शरीर अन्नातील लोह शोषून घेऊ शकत नाही, ज्यामुळे रक्ताची कमतरता होऊ शकते.
दिवसातून ४-५ वेळा साखर असलेला चहा पिल्याने शरीरात कॅलरीज वाढतात, ज्यामुळे वजन वाढणे आणि मधुमेहाचा धोका वाढतो.
चहामध्ये कॅफिन असते. रात्री झोपण्यापूर्वी चहा पिल्याने गाढ झोप येत नाही आणि निद्रानाशाचा त्रास होऊ शकतो.
निरोगी राहण्यासाठी चहाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी माहित असणे गरजेचे आहे.