Mahesh Gaikwad
आजकाल जगभराती रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशरची समस्या सामान्य झाली आहे. कमी वयातील तरूणांपासून ते ज्येष्ठापर्यंत ही समस्या दिसून येते.
बदलती जीवनशैली, दैनंदिन कामाचा ताण या कारणांमुळे ब्लड प्रेशरची समस्या उद्भवते. ब्लड प्रेशर वाढल्याने डोके दुखी, ह्रदयाची धडधड वाढणे यासारख्या समस्या होतात.
ब्लड प्रेशर असंतुलित झाल्यामुळे अनेकजण तर बेशुध्दही होतात. परंतु तुम्ही घरीच काही उपाय केले तर ब्लड प्रेशरची समस्या कमी होण्यास मदत होते.
ब्लड प्रेशर नियंत्रणात यावे, यासाठी सर्वात आधी मीठ खाणे कमी केले पाहिजे. मीठामुळे रक्तदाब वाढण्याची समस्या होते.
नियमितपणे व्यायाम केल्याने तुमचा ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
शांत व पुरेशी झोप घेतल्यानेही रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
रक्तदाब नियंत्रणात राहावा, यासाठी वेळेवर जेवण करावे. उपाशी राहू नये. आहारात हिरव्या भाज्या आणि फळे खावीत.
रक्तदाबाची समस्या असणाऱ्यांनी जास्त प्रमाणात दुग्धजन्य पदार्थ आणि चरबीयुक्त पदार्थ खाणे टाळले पाहिजे. ही माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे.