Mahesh Gaikwad
मॉन्सूनच्या ढगांनी सर्व देश व्यापला आहे. मॉन्सूनच्या पहिल्या सरींनी अंगाची लाहीलाही करणाऱ्या उकाड्यापासून सुटका केली आहे.
परंतु पावसाळ्यात अनेक आजारांनाही निमंत्रण मिळते. वातावरण बदलल्यामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या जाणवू लागतात.
पावसाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
पावसाळ्यात सर्रास होणार आजार म्हणजे सर्दी-खोकला. याशिवाय पोट खराब होणे, जुलाब यासारख्या आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे योग्य आहार घेणे गरजेचे असते.
बदामामध्ये व्हिटामिन-ई आणि अनेक अँटीऑक्सिडंट असतात, जे शरीराला आतून मजबूत करतात.
याशिवाय फळांमध्ये संत्री, मोसंबी, द्राक्षे यासारखी व्हिटामिन-सीचे प्रमाण भरपूर असणारी फळे खावीत, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.
तसेच लसूण आणि आले यामध्ये असणारे औषधी गुणधर्म तुम्हाला आतून मजबूत करण्यास मदत करतात.
पावसाळ्यात दूधाचा चहा घेण्याऐवजी ग्रीन टी किंवा हर्बल टी प्यावा. हा चहा आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतो. ही माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे.